वेब टीम : अहमदनगर वादाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे नगर शहराजवळील भिंगार येथे कीर्तनासाठी शनिवा...
वेब टीम : अहमदनगर
वादाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे नगर शहराजवळील भिंगार येथे कीर्तनासाठी शनिवारी (दि.15) दुपारी आले होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांच्या सुरक्षेसाठी आयोजकांच्यावतीने खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
बाउन्सरच्या कड्यामध्येच ते कीर्तनस्थळी आले. तसेच कीर्तन चालू असताना व्हिडिओ शूटिंगलाही बंदी करण्यात आली होती. वादाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
भिंगार येथे श्री शुक्लेश्वर मंदिरांमध्ये महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहात शनिवारी (दि.15) दुपारी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते.
महाराजांचे कीर्तन होणार का नाही, याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, इंदुरीकर महाराज दुपारी 12 च्या सुमारास भिंगारमध्ये आले. त्यांच्यासाठी खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
गाडीतून उतरल्यानंतर ’बाउन्सर’ नी त्यांच्याभोवती कडे केले. त्या सुरक्षेतच त्यांना कीर्तनस्थळी आणण्यात आले. त्यानंतर सर्वात आधी कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी लावण्यात आलेले कॅमेरे काढण्यास सांगण्यात आले.
जोपर्यंत हे कॅमेरे काढण्यात येणार नाही, तोपर्यंत कीर्तन सुरू होणार नाही, अशी सूचनाही आयोजकांनी दिली. अखेर कॅमेरे काढल्यानंतर कीर्तन सुरू करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
COMMENTS