वेब टीम : अहमदनगर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी 53 वर्षीय शिक्षिकेच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे...
वेब टीम : अहमदनगर
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी 53 वर्षीय शिक्षिकेच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे मंगळसुत्र हिसकावुन चोरून नेले. ही घटना केडगाव उपनगरातील शाहुनगर येथील मुळे कॉलनीत रविवारी (दि.9) दुपारी 2.45 च्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सौ. सुनीता सोन्याबापु सोनवणे (वय-53, रा. मुळे कॉलनी, शाहुनगर, केडगाव) या त्यांच्या घरासमोर उभ्या असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे मंगळसुत्र हिसकावुन चोरून नेले.
या प्रकरणी सौ. सुनीता सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रणदिवे हे करीत आहेत.
COMMENTS