महागाईचा उडणार भडका; एका गॅस सिलेंडरमागे १५० रुपयांनी वाढ


वेब टीम : मुंबई
गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एका सिलेंडरमागे जवळपास 150 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

बुधवारपासून नवीन दर लागू होणार आहेत. नवीन किंमती तातडीने अंमलात आणल्या गेल्या आहेत.

इंडियन ऑईलनुसार, मुंबईत गॅस सिलेंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होत आहे. तर दुसरीकडे तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा स्वयंपाक घरातल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे.

सलग तिसर्‍या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत गॅस सिलेंडरच्या दरात 145 वाढ झाल्याने आता सिलेंडरची किंमत 829.50 रुपये इतकी झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post