'या' मराठी अभिनेत्रीसोबत झाली छेडछाड; गुन्हा दाखल

file photo

वेब टीम : मुंबई
अभिनेत्री मानसी नाईक पुणे जिल्ह्यातील रांजणगावात एका कार्यक्रमात सादर करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत छेडछाड झाल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. रांजणगावात युवा सेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात मानसीला आमंत्रित करण्यात आले होते. तिथे स्टेजवर मानसी सादरीकरण करत असतानाच एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले व दमदाटी करून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मानसीच्या तक्रारीच्या आधारे कलम 354 व 506 अन्वये साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post