वेब टीम : पुणे विमानाने हैदराबाद येथून राज्यात विविध शहरात येऊन चोर्या करणार्या सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने चोरीचा मुद्देमा...
वेब टीम : पुणे
विमानाने हैदराबाद येथून राज्यात विविध शहरात येऊन चोर्या करणार्या सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने चोरीचा मुद्देमाल स्वीकारणार्या टोळीसह अटक केली.
अटक करण्यात आलेल्या हायप्रोफाईल चोरट्याने पुण्यात 82 ठिकाणांसह इतर ठिकाणी एकूण 127 गुन्हे केले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीसह तब्बल 37 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सलीम अली हुसेन खान ऊर्फ मुन्ना कुरेशी उर्फ मोहमंद हमीद हबीब कुरेशी (वय-46, गोवंडी, मुंबई, मूळ रा. हैदराबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा पुण्यातील साथीदार ईश्वर उर्फ चिंट्या शिंदवेळ (येरवडा) याच्यासह चोरीचा ऐवज स्वीकारणार्या शरीफ मोहम्मद ख्वाजा मैनुद्दीन शेख, बिलाल उर्फ अशोक गोविन्द प्रधान, अब्दुल सत्तार मोहम्मद नजीर अहमद सत्तार, मोघल अन्वर अली करीम बेग, प्रभु कल्लापा नंजवडे (सर्व रा. हैदराबाद) यांना अटक करण्यात?आले आहे.
मुख्य आरोपी सलीम हा सराईत गुन्हेगार असून जून 2018 मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे. तो मुळचा हैदराबाद येथील रहिवासी असून मागील दीड वर्षांपासून पुण्यासह नाशिक, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात चोर्या करत होता.
मौजमजा करण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला. बहुतांश शहरातील उच्चभ्रु सोसायटीत चोरी करण्यासाठी त्याठिकाणी स्थानिक चोरट्यांची मदत घेत होता. चोरी करण्यासाठी सलीम घरामध्ये जाण्यापुर्वी खबरदारी म्हणून साथीदाराच्या हातात पेपरस्प्रे बाटली देत होता.
त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत चोरी केल्यानंतर तो पळ काढत होता. हैदराबादमध्ये राहताना त्याने भाडेतत्त्वावर सदनिका घेतली होती. चोरी करण्यासाठी तो विमानाने पुण्यात येऊन अलिशान मोटारीने टेहाळणी करून रात्रीच्या वेळी सोसायट्यांमध्ये चोर्या करायचा.
पुण्यातील साथीदार ईश्वर शिंदवळच्या मदतीने त्याने 82 उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकांमध्ये चोरी केली होती. त्यानंतर चोरीचा ऐवज हैदराबाद येथे नेऊन तेथील साथीदारांमार्फत विकला होता.
त्याने पुण्यासह राज्यातील विविध शहरात तब्बल 127 गुन्हे केले असून शहरात 82 चोरीचे गुन्हे केले आहेत. उर्वरित 47 गुन्हे मुंबई, दिल्ली व हैदराबाद येथे केल्याचे उघडकीस आले आहे.
COMMENTS