बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढून देशाची साफ-सफाई करा : राज ठाकरे कडाडले (Video)


वेब टीम : मुंबई
जगात बहुसंख्य देश सुरक्षा म्हणून नागरिकांची नोंद ठेवत असतात आणि घुसखोरांना हुडकून त्यांच्या देशात परत पाठवतात किंवा जेलमध्ये टाकतात. देशाची सुरक्षा म्हणून भारतानेही हे केले पाहिजे.

नागरिक नोंदणी कायदा आज आणला नाही तरी तो कधीतरी आणावाच लागणार आहे. या देशाची साफ – सफाई झालीच पाहिजे, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

नागरिक संशोधन कायदा आणि नागरिक नोंदणी कायद्याविरुद्ध देशात मोर्चे काढणाऱ्यांना राज ठाकरे यांनी इशारा दिला की तुमच्या मोर्चाला आज मोर्चाने उत्तर दिले.उद्या दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ. पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा या मागणीसाठी मनसेने काढलेल्या मोर्चात आझाद मैदान येथे ते बोलत होते.

पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकललेच पाहिजे; त्याबाबत तडजोड होऊ शकत नाही. या कायद्याबाबत माहिती नसणारेही यावर बोलत आहेत!

धार्मिक अत्याचारांमुळे पाकिस्तान, बांगलादेश अफगाणिस्तान येथून भारतात येणाऱ्यांसोबत मुसलमानांनाही भारताचे नागरिकत्व द्या ही मागणी चूक आहे, हा देश धर्मशाळा आहे का? जगात माणुसकीचा ठेका आम्हीच घेतला आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post