file photo वेब टीम : दिल्ली ‘आज के शिवाजी नरेन्द्र मोदी’ या पुस्तकावरुन झालेल्या वाद सरलेला असतानाच, आता भाजपा नेत्या आणि माजी केंद्र...
file photo |
वेब टीम : दिल्ली
‘आज के शिवाजी नरेन्द्र मोदी’ या पुस्तकावरुन झालेल्या वाद सरलेला असतानाच, आता भाजपा नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी लागला. त्यावर उमा भारती यांनी ट्विट करताना ही तुलना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करण्याची ताकद कुणात नाही. देशाच्या जनतेने मोदींना आपलेसे केलेले आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद, असे उमा भारती यांनी यामध्ये म्हटले आहे.
त्यांच्या या वक्तव्यामूळे पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
COMMENTS