पंतप्रधान मोदींची घोषणा; मध्यरात्रीपासून सलग २१ दिवसांसाठी देशभरात 'लॉकडाऊन'


वेब टीम : दिल्ली
कोरोना या साथीच्या आजारापासून देशाला संक्रमित होण्यापासून रोखण्यासाठी देशाला मोठे युद्ध लढावे लागणार आहे. देशाला कोरोनापासून वाचविण्यासाठी देश लॉकडाऊन करणे हाच एकमेव उपाय आहे.

कोरोना म्हणजे – कोई रोड पे ना निकले ही सोशल ममीडियावरच्या पोस्टचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या गंभीर स्थितीवर भाष्य केले.

मोदी म्हणाले, ‘जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. कोरोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे.

हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, अत्याधुनिक सेवा सुविधा मुबलक असलेल्या देशालाही या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

देशात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विट करून सांगितलं होतं. अखरे पंतप्रधान मोदी यांनी भूमिका मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,’ कोरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. आगीसारखा हा आजार पसरत चालला आहे.

त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणं आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी आज मी इथे मोठी घोषणा करत आहे. ध्यान देऊन ऐका.

आज रात्री बारा वाजेपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल. असेही मोदी यांनी नमुद केले.

या कठीण परिस्थितीत नागरिकांनी घरात बसून कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी मदत करावी असे आवाहन मोदींनी केले.

त्याचप्रमाणे, अहोरात्र सेवा देणा-या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, मीडिया यांंच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना हा असा आजार आहे ज्या देशांमध्ये मेडीकलच्या अत्याधुनिक सुविधा आहेत, अमेरिका, जर्मनी सारखे देशसुद्धा या आजारापासून बचावलेला नाही आहे.

त्यामुळे भारतीयांपुढेही या आजाराचा सामना करण्याचे मोठे आवाहन आहे. त्यामुळे घराची सीमारेषा न ओलांडता घरात बसून सरकारला सहकार्य करण्य़ाचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post