औरंगाबाद विमानतळाचे अखेर नामांतर; आता छत्रपती संभाजी महाराज दिले नाव


वेब टीम : मुंबई
औरंगाबाद विमानतळाचे नामकरण आता ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’, असे करण्यात आले आहे. आज गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या पृष्ठभूमीवर, हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. नामकरणाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

मंत्रिमंडळाने आज संबंधित प्रस्तावास मान्यता दिली असून, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन, नागरी विमान मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. सदर निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post