माणसाचे रक्त आणि जनावरांचे; काय आहे नेमका फरक?


वेब टीम : पुणे
अनेकदा गुन्हेगार असे म्हणतात की त्यांच्या अंगावर, कपड्यांवर, हत्यारांवर सापडलेले रक्त मृत व्यक्तीचे नसून कोणत्यातरी प्राण्याचे आहे.

अशा वेळी न्यायवैद्यकशास्त्राच्या तज्ज्ञांना रक्त माणसाचे आहे की प्राण्याचे याचा शोध घ्यावा लागतो.

माणसांच्या व प्राण्यांच्या रक्तात फरक असतोच. मात्र हा फरक दाखवून देण्यासाठी काही विशेष तपासण्या कराव्या लागतात.

प्रेसीपीटीन, लॅटेक्स तपासण्यामुळे प्राण्याचे रक्त ओळखता येते. परंतु ह्या तपासण्या खर्चिक असतात.

माणूसगोरिला, गाय-म्हैस, बकरी-मेंढी अशा जास्त साधर्म्य असणार्‍या प्राण्यांच्या रक्ताची ओळख पटवणे यात खूप अवघड जाते.

विविध विकरांचा वापर करणार्‍या अद्ययावत तपासण्याही उपलब्ध आहेत. या तपासण्यांना खूप कमी वेळ लागतो.

यात मात्र खूप साधर्म्य असणार्‍या (जसे गाय-म्हैस…) प्राण्यांच्या रक्ताचीही वेगळी ओळख पटवता येते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post