वेब टीम : बीजिंग चीनच्या कोरोनाने चीनमधून ठरल्याप्रमाणे आता काढता पाय घेतलेला असून, तो जगभर पसरलेला आहे. जगावर राज्य करण्याची चीनची आ...
वेब टीम : बीजिंग
चीनच्या कोरोनाने चीनमधून ठरल्याप्रमाणे आता काढता पाय घेतलेला असून, तो जगभर पसरलेला आहे.
जगावर राज्य करण्याची चीनची आकांक्षा चीनचे अपत्य असलेल्या कोरोना विषाणूने अप्रत्यक्षपणे का होईना पूर्ण केली आहे.
चीनमध्ये आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे. एवढेच नव्हे तर चीनने उत्पादनाचा धडाका लावला आहे.
जगाला कोरोना साथ दिल्यानंतर आता चीनच मास्क, ग्लोव्हज् उपलब्ध करून देणार आहे.
कोरोना साथीत लागणारी अगदी व्हेंटिलेटरसह सगळी वैद्यकीय साधने पुरवीत आहे.
अर्थात, चीनने कोरोना जगाला फुकट दिला; पण हा सगळा माल जगाला विकत देऊन चीन बक्कळ पैसा कमवीत आहे.
आता चीनने आपली भिंतही बघण्यासाठी खुली केली आहे. कंपन्याही खुल्या केल्या आहेत.
उत्पादकांना प्रोत्साहन दिले जात आहे. चीन लाईनवर आला आहे. चीनमध्ये ८९५० उत्पादक जोमात मास्क बनवत आहेत.
अर्थात, २०२० च्या जानेवारीपासून हे सुरू आहे. मास्कचे दैनंदिन उत्पादन ११६ दशलक्ष आहे.
अनेक परकीय ऑर्डर चीनकडे बूक झाल्या आहेत. वानगी म्हणून डॉन पॉलिमर ही कंपनी बघा... ही कंपनी मास्कचे कापड बनवते.
कंपनीचा चीनमधील मास्क मार्केटमधील वाटा ४० टक्के आहे. जानेवारीपासून कंपनीच्या शेअरचा दर सतत वाढता आहे.
तीन महिन्यांपासून या कंपनीचा शेअर सतत उसळी घेत-घेत आज तब्बल ४१७ टक्क्यांनी वधारला आहे.
कंपनीचा संस्थापक चेअरमन १.९ अब्ज डॉलरचा धनी बनलेला आहे.
COMMENTS