तामिळनाडूत कोरोनाचा कहर सुरु; पहिला बळी


वेब टीम : मदुराई
कोरोनामुळे तामिळनाडूत एकाचा रुग्णाचा मृत्यू झाला.

कोरोना विषाणूमुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील कोरोनामुळे दगावणाऱ्यांचा आकडा ११ वर पोहोचला आहे.

तामिळनाडूतील मदुराई येथील राजाजी रुग्णालयात या ५४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

२३ मार्च रोजी त्याला राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

मात्र त्याने उपचाराला साथ दिली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

या रुग्णाला मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता.


त्यामुळे त्याची प्रकृती वारंवार खालावत गेल्याने आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

हा रुग्ण परदेशातून आला होता,असे सूत्रांनी सांगितले.

तामिळनाडूत एकूण १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आज एकाचा मृत्यू झाला तर एक रुग्ण बरा झाला आहे.

या शिवाय देशात कोरोनाचे एकूण ५६० रुग्ण आढळले. त्यापैकी ११ लोकांचा मृत्यू झाला असून ४६ रुग्ण बरे झाले आहेत.

देशातली कोरोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालल्याने मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केले आहे.

लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post