२ लाखावरील कर्जदार शेतकर्‍यांना दिलासा; भूमीपुत्रांना रोजगार देण्यासाठी नवीन योजना


वेब टीम : मुंबई
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, अवकाळी पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्याने स्वखर्चातून मदत केली.

नैसर्गिक संकटात असलेल्या शेतकर्‍यांना आम्ही कोणत्याही अटी व नियमांमध्ये न अडकवता उभे करत आहोत.

पीक विमा योजनेत राज्याचाही मोठा वाटा आहे. परंतु, पण वेळेवर विमा मिळत नाही.

यावर सुधारणेसाठी मंत्रिगट नेमल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

केवळ कर्जमाफी नव्हे, तर नियमित कर्ज भरणार्‍यांना सुद्धा दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे अजित पवार म्हणाले आहेत.

बेरोजगारीवर बोलताना, राज्यातील किमान 10 वी उत्तीर्ण झालेल्या तरुणतरुणींच्या हाताला रोजगार देणे हे राज्याचे ध्येय आहे.

कुषल मनुष्यबळ तयार करणे ही सध्याची गरज आहे. त्यातही स्थानिकांना कसे रोजगार मिळतील यावर भर दिला जाणार आहे.

यासाठी सरकार स्थानिक प्रकल्पांमध्ये 80 टक्के नोकर्‍या स्थानिकांसाठी राखीव ठेवणार आहे.

त्यासंदर्भात कायदा आणला जाईल असे अजित पवारांनी आश्वस्त केले.

केंद्र सरकारच्या रोजगार योजनेत सध्या काही त्रुटी असल्याचे सांगताना अजित पवारांनी राज्यात मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post