मोदी सरकारचे आर्थिक पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक; कॉग्रेसचे टीकास्त्र


वेब टीम : दिल्ली
मोदी सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर काँग्रेसने जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

हे पॅकेज २० लाख कोटींचे नव्हे, तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.९१ टक्के म्हणजे केवळ १ लाख ८६ हजार ६५० कोटींचे असल्याची टीका काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.

सरकारकडून प्रत्यक्ष मदत कमी आणि केवळ कर्जे आणि जुन्याच योजनांची पुनरावृत्ती कशी आहे, याचा पाढाही त्यांनी पत्रकार परिषदेत वाचला.

या पॅकेजचा सरकारने फेरविचार करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

केंद्र सरकारचे या वर्षीचे अंदाजपत्रक ३० लाख कोटींचे होते.

या अंदाजपत्रकाच्या पलीकडे ज्या घोषणा आहेत, त्याच केवळ आर्थिक मदत म्हणून गृहीत धरल्या जाऊ शकतात.

यात ज्या मोजक्या गोष्टी पात्र ठरतात त्याची यादी चिदंबरम यांनी दिली.

ही बेरीज केवळ अवघी १ लाख ८६ हजार कोटी असल्याचाही दावा केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post