पंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट


वेब टीम : मुंबई
विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली आहे.

शिंदे यांनी ट्विट करत मनातील खदखद बाहेर काढली.

शिंदे ट्विटमध्ये म्हणाले की,
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी "विधानपरिषदेची नेते, इच्छुक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील",  असे म्हणले होते.
त्यानुषंगाने दोन दिवसात पंकजाताई मुंडे यांनी चांगला अभ्यास (त्यामुळे श्री रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) केला.
जो मला आणि इतरांना जमला नाही. - प्रा. राम शिंदे.
या ट्विटच्या माध्यमातून राम शिंदे यांनी एकप्रकारे पंकजा मुंडेंनी वापरलेल्या दबावतंत्रावरच बोट ठेवले आहे.

पंकजांचं ऐकून कराड यांना उमेदवारी दिली आणि मला मात्र ते जमलं नाही, असे म्हणत शिंदेंनी स्वतःची समजूत काढल्याचे दिसून येते.

या ट्विटमुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post