सलमान खानच्या नावाने चालू होती फसवणूक; गुन्हा दाखल


वेब टीम : मुंबई
सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या नावाने असे असून लोकांना खोटे मेल पाठवून सलमानच्या आगामी चित्रपटात काम देण्याची खोटी ऑफर देत असल्याचे समोर आले आहे.

हा सर्व प्रकार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अंश अरोराने उघडकीस आणला आहे.

तसेच त्याने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अंशला सलमान खानच्या चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर मिळाली होती.

त्यासाठी त्याला काही फोन, मसेज आणि इमेल देखील आले होते. हे इमेल shruti@salmankhanfilm.com या आयडीवरुन पाठवण्यात आले होते.

अंशला ‘टायगर जिंदा है ३’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

३ मार्च रोजी या भूमिकेसाठी अंशचे ऑडिशन घेण्यात येणार होते.

तसेच चित्रपट निर्माते प्रभूदेवा यांच्यासोबत त्याच दिवशी ११ वाजता मिटींग असल्याचे देखील सांगण्यात आले होते.

पण नंतर काही कारणास्तव ही मिटींग रद्द करण्यात आल्याचे अंशने सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post