कडुनिंबाची पाने : 'या' समस्यांसाठी आहे वरदान...


वेब टीम : मुंबई
कडुनिंबाला आयुर्वेदात खूपच मोलाचं स्थान आहे. 

या झाडाच्या मुळांपासून ते फुलांपर्यंत सगळ्यात औषधी गुणधर्म असल्यानं त्याला वृक्ष औषधालय असंही म्हटलं जातं. 

विशेष म्हणजे ज्यांना आपल्या त्वचेचं सौंदर्य खुलवायचं असेल त्यांच्यासाठी  कडुनिंब म्हणजे वरदान होय.

रक्त शुद्ध करण्यासाठीही  कडुनिंबाचा उपयोग होतो.  

रक्त शुद्ध झाल्यानं त्वचेच्या अनेक समस्या या दूर होतात.

कडुनिंबाच्या पानात बुरशीनाशक व जंतुनाशक गुण आहेत. 

त्यामुळे चेहऱ्यावर आलेले मुरुम, पुरळ यामुळे दूर होतात. 

त्यामुळे सौंदर्यप्रधानांपेक्षा मुरुम दूर करण्यासाठी कडुनिंब हे अधिक फायदेशीर असतं.

कडुनिंब तेलात फॅटी अ‍ॅसिड व ई जीवनसत्त्व आहेत  

त्यामुळे खरुज, नायटा यांसारख्या व्याधी सहज बऱ्या होतात.

कडुनिंबाच्या पानांची पेस्ट ही केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे. 

त्याचप्रमाणे कडुनिंबाची पानं उकळवून त्या पाण्यानं केस धुतल्यास घामामुळे येणारे खाज दूर होते. 

तसेच कोंड्याची समस्याही निघून जाते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post