अहमदनगर : कोरोनाचे आणखी दहा रुग्ण वाढले; बाधितांची संख्या १४१ वर


वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (दि.३१) कोरोना बाधित १० रुग्णांची वाढ झाली आहे.तर ५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

तसेच दोघे बाधित असलेले रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या ७० झाली आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात १० नवीन रुग्ण आढळले असून त्यामध्ये कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगी अशा दोघांचा समावेश आहे.

ते दोघे यापूर्वीच्या बाधीत रुग्णाचे नातेवाईक आहेत. 

राहाता तालुक्यातील ममदापूर बाभळेश्वर येथील ३५ वर्षीय पुरुष हा बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता. 

संगमनेर तालुक्यात ५रुग्ण आढळले असून यामध्ये कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली ५२ वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील २७ वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले. 

त्यांना सारी (श्र्वसनाचा त्रास) ची लक्षणे. कोरोना अहवालही पॉझिटिव्ह. कोल्हेवाडी रोड संगमनेर येथील २२ व २४ वर्षीय युवक हे बाधित आढळले आहेत.ते सर्व बाधिताच्या संपर्कातील आहेत.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मुंबईहून आलेली ३६ वर्षीय महिला, केडगाव अहमदनगर येथील मुंबई येथे कामाला असलेली २८ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post