चीनवरचे अवलंबित्व संपणार; भारताने विकसित केली कोरोनावरील चाचणीसाठी रॅपिड टेस्ट स्ट्रीप


वेब टीम : दिल्ली
कोरोना चाचणीच्या रॅपिड टेस्टसाठी आवश्यक असणारी पेपर स्ट्रीप भारताने विकसित केली आहे. त्यामुळे स्ट्रीपसाठी चीनवर असलेले अवलंबित्व कमी होणार आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) प्रयोगशाळेने कोरोना व्हायरसची रॅपिड टेस्ट करणारी पेपर स्ट्रिप विकसित केली आहे.

‘फेलुदा’ असे या पेपर स्ट्रिपचे नाव ठेवण्यात आले आहे.

हे किट विकसित करण्यासाठी सीएसआयआर प्रयोगशाळेने मंगळवारी टाटा अॅन्ड सन्सशी यांच्याशी हातमिळवणी केली.

मे महिन्याच्या अखेरीस हे किट वापरण्या करता उपलब्ध होईल अशी माहिती सीएसआयआरने दिली आहे.

सत्यजित राय यांनी ही स्ट्रिप विकसित केली आहे.

‘फेलुदा’ हा संपूर्ण स्वदेशी वैज्ञानिक शोध आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आणि वेगाने कोरोना चाचणी करण्यास उपयुक्त आहे.

याचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ही टेस्ट अगदी स्वस्तात उपलब्ध होणार आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे.

परिणामी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांच्या कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे.

यापूर्वीच कोरोना रॅपिड चाचणीला केंद्राने परवानगी दिली होती.

मात्र, चीन वरुन मागवण्यात आलेल्या किटमध्ये काही त्रुटी आढळल्याने हा निर्णय लांबणीवर पडला होता.

मात्र, आता हे किट विकसीत झाल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात मदत आहे.

कोविड – १९ च्या निदानासाठी पारंपरिक स्वॅब टेस्टिंगचा निकाल कळण्यासाठी जवळपास २४ तास लागू शकतात तर रॅपिड टेस्टिंगच्या माध्यमातून अवघ्या १० ते १५ मिनिटात रिझल्ट कळू शकतो.

स्वॅब टेस्टिंगमध्ये घशातील द्रव्याचे नमुने घेतले जातात.

पण रॅपिड टेस्टिंगसाठी रक्ताचे नमुने घेतले जातात. स्वॅबचे नमुने चाचणीसाठी तत्सम लॅबमध्ये पाठवले जातात.

मात्र रॅपिड टेस्टिंग किट तिथल्या तिथे निकाल सांगते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post