आरोग्यदायी भोपळा : खा आणि निरोगी राहा...


वेब टीम : पुणे
तुम्हाला माहितीये फळभाज्यांमध्ये लाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ, सर्वांत स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी उत्तम फळभाजी आहे. 

भोपळ्यात अ, क आणि ई जीवनसत्त्व असून बी कॉम्प्लेक्स आणि फॉलेट भरपूर प्रमाणात असतं.  

त्यामुळे अनेक रोगांपासून लढण्याकरता या भाजीचा खूप फायदा होतो. 

लाल भोपळ्यात असलेल्या अ आणि  बीटा कॅरोटिनमुळे डोळ्याचं आरोग्य चांगलं राहातं. 

त्यामुळे जेवणात भोपळ्याचा सहभाग आवर्जून करावा.

भोपळ्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचप्रमाणे संसर्गापासून लढण्यासाठी भोपळ्यात असलेले जीवनसत्त्व शरीरास मदत करतात. 

भोपळ्याच्या बियांमध्येही प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. 

या बियांमध्ये असलेली खनिजे मधुमेहांच्या रुग्णासाठी अधिक फायदेशीर असतात. 

रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी या बिया फायदेशीर आहेत असं संशोधनातून समोर आलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post