दररोज १५ मिनिटे सूर्यनमस्कार करा आणि मिळवा 'हे' आश्चर्यकारक फायदे


वेब टीम : पुणे
भारतीय माणूस सूर्यनमस्कार फ़क़्त वाचतो, पाहतो, ऐकतो आणि दुर्लक्षित करतो.

भले त्याला अध्यात्म आणि संस्कृती याची जोड असोत, भारतीय मंडळी अजूनही या व्यायामाच्या नादी लागणे शक्यतो टाळतात.

मात्र, हा एक सोपा आणि घरातल्या घरात करता येणारा खूप छान व्यायाम आहे.

१२ योगांचे एकत्रित मिश्रण म्हणजे सूर्यनमस्कार आहेत.

१२ स्टेप्स पूर्ण झाल्या की एक सूर्यनमस्कार पूर्ण होतो.

अशा पद्धतीने आपण घरी किमान १५ मिनिटे असे सूर्यनमस्कार करून फिट न हेल्दी राहू शकतो.

त्याच्या स्पेप्स पाहण्यासाठी तुम्ही गुगल करून ते शिका.

मात्र, याचे फायदे आणि इतर काही माहिती तर अगोदर जाणून घ्या.

सकाळी पोट खाली असतानाच हा व्यायाम करावा.

खूप गरजेचे नी आपल्याला झेपेल अशा इतरही काही स्टेप्स आपण यामध्ये जोडू शकता.

मात्र, त्यामुळे मूळ १२ स्टेप्स पूर्ण होतील याचीही काळजी घ्या.


यामुळे हृदय आणखी हेल्दी होते. आपल्या शरीरामधील मज्जासंस्था सक्षम होते.

वजनामध्ये घट होण्यासह आपले शरीर आणखी लवचिक आणि सुडोल बनाते.

स्नायू लवचिक आणि बळकट होतात. एकूण सर्व शरीराची यामध्ये चांगली हालचाल होते.

अवयवांना आणि शरीराला ताकद मिळून इम्युनिटी पॉवर वाढते.

मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी सूर्यनमस्कार करावेत.

तसेच यासह आपण चालणे, पोहणे आणि इतरही व्यायाम करावेत.

रोज किमान १२ सूर्यनमस्कार केल्याने फायदा होतो.

आपण जर कोणत्याही खेळात करिअर करू इच्छित असल्यास अशा तरुणांनी व युवतींनी यावर फोकस करावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post