भारताने दिला पाच मित्र राष्ट्रांना मदतीचा हात... पाठवली वैद्यकीय मदत


वेब टीम : दिल्ली
कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, कोमोरोस आणि सेशल्स या पाच मित्र देशांना मदतीचा हात दिला आहे.

या देशांकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार भारताने एका नौदल जहाजाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत पाठवून दिली आहे.

तर संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये भारताने पाठवलेल्या ८८ परिचारिकांची पहिली तुकडी दाखल झाली आहे.

यात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक व केरळमधील परिचारिकांचा समावेश आहे.

भारतीय नौदल जहाज 'केसरी' वैद्यकीय चमू, आवश्यक औषध व अन्नपदार्थ घेऊन पाच देशांच्या दिशेने रवाना झाले आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

या भागातील कोणत्याही संकटाच्या स्थितीत सर्वात प्रथम पुढाकार घेण्याच्या आपल्या भूमिकेनुसार भारताने हे पाऊल उचलले आहे.

कोरोनाचे संकट वाढल्यामुळे या देशांनी भारताकडे मदतीची विनंती केली होती.

यानंतर निर्णय घेत दोन वैद्यकीय सहाय्यता चमू, कोरोनाशी संबंधित आवश्यक औषध आणि इतर अन्नपदार्थ पाठविले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post