काँग्रेसच्या आरोपावर रेल्वे मंत्रालय म्हणते, मजुरांकडून पैसेच घेतले नाहीत...


वेब टीम : दिल्ली
गरीब आणि असहाय्य मजुरांकडून आपल्या घरी परतण्यासाठी केंद्र सरकार तिकीट खर्च वसूल करत असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका केली.

इतकेच नाही तर लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या आणि घरी परतणाऱ्या मजुरांचा आणि श्रमिकांचा रेल्वे तिकीटाचा खर्च काँग्रेसकडून करण्यात येईल, असे सोनिया गांधींकडून जाहीर केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून तत्काळ स्पष्टीकरण दिले.

यात, ‘रेल्वे थेट मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतच नसल्याचा’ दावा रेल्वे मंत्रालयाने केला.

शिवाय या तिकिटाचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले.

या अगोदर ‘श्रमिक रेल्वे’साठी रेल्वे मंत्रालयाकडून जारी केलेल्या दिशा-निर्देशानुसार, श्रमिक विशेष रेल्वेच्या तिकिटांची जेवढी मागणी राज्य सरकारकडून केली जाईल,

तेवढीच तिकीटे छापण्यात येतील तसेच राज्य सरकार ही तिकीटे प्रवाशांना सोपवतील आणि तिकिटाचे पैसे एकत्र करून ही रक्कम रेल्वेकडे सोपवतील, असे म्हटले गेले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post