जगाला दाखविण्यासाठी उत्तर कोरियाने समोर उभा केला किम जोंग उनचा डुप्लिकेट?


वेब टीम : दिल्ली
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन ११ एप्रिलपासून २० दिवस कुठेही दिसला नाही.

१ मे रोजी अचानक राजधानी प्योंगयांगजवळ सेंचोन येथे एका खत कारखान्याच्या कार्यक्रमात तो लोकांसमोर आला.

उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी त्याची बातमी व अनेक छायाचित्रे प्रकाशित केली.

आता, या कार्यक्रमात दिसलेला किम जोंग उन हा खरा नव्हता, त्याचा ‘डुप्लिकेट’ होता, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ब्रिटेनमधील टोरीच्या माजी खासदार लुईस मेन्श्च यांनी याबाबत काही छायाचित्रे व्हायरल करून म्हटले आहे की, उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी प्रकाशित केलेल्या छायाचित्रातील व्यक्ती किम जोंग उन नाही, कुणी दुसराच आहे.

किम जोंग उन आणि त्याच्या दातात फरक आहे. इतरही काही गोष्टी जुळत नाहीत. नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

दुसऱ्याही अनेक लोकांनी असेच मत व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की, खत कारखान्याच्या कार्यक्रमातील छायाचित्रात दिसणारा व्यक्ती किम जोंग उन नाही, त्याचा ‘डुप्लिकेट’ आहे.

किम जोंग उन आणि त्याच्या ‘डुप्लिकेट’च्या दात, मनगट आणि कानात फरक आहे.

ब्लॉगर जेनिफर जेंग यांनीही अनेक छायाचित्रे  शेअर केली आहेत.

किमच्या दात, कान, केस आणि बहिणीचे छायाचित्र टाकून म्हटले की – छायाचित्रातल्या किमच्या मनगटावरची खूण पाहा.

किमच्या मनगटावर अशी कोणतीही खूण नव्हती.

मात्र काही लोक म्हणतात हृदयावरच्या शस्त्रक्रियेमुळे मनगटावर हा व्रण आला असेल.

या छायाचित्रात किमसोबत दिसणारी त्याची बहीणही खरी नाही; तिची ‘डुप्लिकेट’ आहे, असेही लोक म्हणत आहेत.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, जगात हुकूमशाह त्यांच्या ‘डुप्लिकेट’चा वापर करत होते.

यासाठी हिटलर, स्टॅलिनपासून सद्दाम हुसैन यांची नावे चर्चेत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post