कोल्हापूर : नव्याने तीन जणांना झाली कोरोनाची लागण


वेब टीम : कोल्हापूर
लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता आणल्याने हळूहळू पूर्वपदावर येत असलेल्या कोल्हापुरात आज आणखीन तिघे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

सीपीआर रुग्णालयात दाखल असलेल्या दोन युवकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव आले.

त्यांना कोरोना उपचार कक्षात तातडीने दाखल केले आहे.

यातील तेवीस वर्षीय युवक केरले (ता.शाहुवाडी) येथील आहे.

तर दुसरा वीस वर्षीय युवकही माणगाव तालुका शाहूवाडी येथील असून तिसरा रूग्ण पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील आहे.

तो मुंबई येथून आला आहे.

केरले येथील युवक गेल्या तीन दिवसापूर्वी सीपीआर रुग्णालयात प्रकृती बरी नसल्याने दाखल झाला होता.

त्याचा कोरोना तपासणी वेळी नमुने घेतला होता.

त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव आहे.

यातील एक युवक मुंबईतून प्रवास करून आलेला आहे.

त्याची तपासणी केली असता त्याचा नमुने कोरोना पॉझिटिव आले.

शाहूवाडी तालुक्यातील हा सातवा कोरोना रुग्ण आहे.

यापूर्वी पाच जण कोरोना ग्रस्त होते. ते पाचही कोरोना मुक्त होऊन गावी परतले आहेत.

त्यापाठोपाठ आज युवक कोरोना बाधित आढळल्याने शाहूवाडी तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post