वेब टीम : दिल्ली देशातला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. १ जूनपासून ३० जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असण...
वेब टीम : दिल्ली
देशातला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
१ जूनपासून ३० जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे.
लॉकडाऊन ५.० हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे.
कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात ८ जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्याने सुरु होणार आहेत.
कर्फ्युची वेळ कमी करण्यात आली आहे. रात्री ९ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यु असणार आहे.
शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला आहे.
सर्व बाबी पडताळून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
COMMENTS