काँग्रेसचा नेता मोदींच्या समर्थनार्थ पुढे; आर्थिक पॅकेजचे केले स्वागत


वेब टीम : मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यावर मिलिंद देवरा यांनी त्यांचे जोरदार स्वागत आणि कौतुक केले आहे.

ट्विटमध्ये मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे की, ‘संपूर्ण देश कोरोना महामारीशी संघर्ष करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी वेळेवर आणि निकडीच्या वेळी 20 लाख कोटी रुपये म्हणजेच 226 अब्ज अमेरिकन डॉलरचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.’

‘जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळेवर घोषित केलेले आर्थिक पॅकेज चांगल्या पद्धतीने लागू केले तर आपण एका मानवीय संकटावर मात करू शकू.

जागतिक स्तरावर भारताची भूमिका आणि मेक इन इंडियाच्या क्षमतांचा क्रांतिकारी पद्धतीने विस्तार करू शकू.

कोरोना महामारीच्या संकटाचे आपण सुवर्णसंधी मध्ये परिवर्तन करू शकू.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशवासीयांना संबोधित केलं.

यावेळी मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला.

तसेच मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.

मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये तिबेटमध्ये पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताना अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या उद्गारांचे स्मरण केले.

चीनने संकटावर मात करण्यासाठी ब्रशचे दोन स्ट्रोक मारले.

त्यापैकी एक स्ट्रोक हा संकटाचा मुकाबला करण्यासाठी होता.

तर दुसरा स्ट्रोक हा संकटाचे संधीत रुपांतर करण्यासाठी होता.

ज्यावेळी देशावर संकट येते त्यावेळी या संकटाची जाणीव ठेवण्याबरोबरच या संकटामध्ये दडलेली संधी ओळखणे आवश्यक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post