अहमदनगर : शहरातील 'या' भागातल्या एका नागरिकाला झाली कोरोनाची लागण


वेब टीम : अहमदनगर
नगर शहरातील सारसनगर येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५५ झाला आहे.

या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

नगर शहरात गेल्या काही दिवसंपासून एकही रुग्ण आढळून आला नव्हता.

मात्र, काल शहरातील सुभेदार गल्ली भागात तर आज सारसनगर भागात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तात्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना करणे सुरू केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post