खुशखबर... 'या' दिवशी मॉन्सून होणार केरळमध्ये दाखल...


वेब टीम : पुणे
देशभरात सर्वांनाच मान्सून कधी येणार याची प्रतिक्षा आहे.

मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे.

त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस एक जून पर्यंत केरळात दाखल होऊ शकतो.

असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला.

दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात ३१ मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर मान्सून ठरलेल्या वेळेला एक जून पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते.

एक जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाला नाही तर उर्वरीत भारतातही मान्सूनचे वेळापत्रक बदलते.

अंदमानचा समुद्र, अंदमान-निकोबार बेट, बंगालचा उपसागराचा भाग आणि मालदीवच्या कोमोरीनपर्यंत मान्सून पोहोचला आहे.

पुढच्या ४८ तासात मालदीवचे आणखी काही भाग नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post