आत्मनिर्भर पॅकेजमध्ये मदत नाही; शेअर बाजारात मोठी पडझड


वेब टीम : मुंबई
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील पाच दिवस केंद्र सरकारचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले.

या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये बहुतांश उद्योगांना आर्थिक मदत न मिळाल्याने उद्योगांची पुरती निराशा झाली.

त्यातच कोरोना विषाणूवरून चीन आणि अमेरिका या देशांमधील तणाव वाढल्याचे भांडवली बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजच्या सत्रात बँक आणि वित्त संस्थांच्या शेअरमध्ये विक्रीचा मारा सुरु आहे. सकाळी ११.२७ वाजता सेन्सेक्स १०४५ अंकांनी कोसळला आणि ३००५२ अंकांपर्यंत खाली आला आहे.

निफ्टीत ३०९ अंकांची घसरण झाली असून तो ८८२७ अंकांवर आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ३.४४ टक्क्यांची घसरण झाली.

बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक आदी शेअर २ टक्क्यांनी कोसळले.

विक्रीमुळे निर्देशांकात घसरण सुरु असून, गुंतवणूकदारांचे किमान तीन लाख कोटींचे नुकसान झाले.

दुसरीकडे आयटीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसली.

रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, इन्फोसिस, एचयूएल आदी शेअर तेजीत आहेत.

आशियातील प्रमुख शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post