रस्त्यांच्या कामांना गती द्या; अजित पवारांचे आदेश


वेब टीम : पुणे
कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत.

कामे रेंगाळता कामा नये शिवाय भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नये असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

राष्ट्रीय महामार्ग व पालखी मार्ग संदर्भातील भूसंपादन आढावा आणि सोलापूर – कोल्हापूर रस्ते महामार्गावरील मिरज बाह्यवळण रस्त्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी अजित पवार बोलत होते.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त डाॕ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राष्ट्रीय महामार्ग,राज्य रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथील जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली.

तसेच अडचणी व लागणाऱ्या निधीबाबत चर्चा केली. सातारा जिल्ह्यातील कराड-तासगांव रस्ता व पुलाचे काम लवकर करावे.

सातारा-कोरेगांव-मसवड हा रस्ता महत्त्वाचा आहे.

लोकांची सारखी मागणी असते असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामासाठी येणाऱ्या कामगारांना परवानगी द्या.खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे असे आदेश दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post