कोरोना उद्रेकाला कारणीभूत ठरलेल्या ८३ तब्लिघींवर पोलिसांकडून कारवाई


वेब टीम : दिल्ली
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून वादात राहिलेल्या निझामुद्दीन मरकझ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी परदेशी तबलिघी जमात कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली.

दिल्लीच्या साकेत न्यायालयात पोलिसांनी तबलिघी जमातच्या ८३ परदेशी सदस्यांविरोधात २० पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

या आरोप पत्रात या सदस्यांविरोधात ५ कलमांनुसार गुन्हे दाखल केले.

आरोपपत्र दाखल नसेल तर परदेशी नागरिकांना देशात रोखता येऊ शकत नाही.

त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी आपली कारवाई वेगाने पूर्ण केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य चार्जशीट तबलीघी जमातचा अध्यक्ष मौलाना साद आणि त्याच्या सहकाऱ्यां विरोधात दाखल केली.

परदेशी तबलिघीं विरोधात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात पोलिसांनी त्यांच्यावर व्हिसा नियमांच्या उल्लंघना शिवाय गंभीर आरोप केले आहेत.

त्यांच्यावर प्रवासी व्हिसावर भारतात येऊन धार्मिक उपक्रमांत सहभागी होत व्हिसा नियमांच्या उल्लंघनाचा आरोप केलाय.

या शिवाय त्यांच्यावर कलम १४४ च्या उल्लंघनाचा आरोपही केला आहे. त्यांच्यावर कलम १८८ नुसारही आरोप ठेवले आहेत.

शिवाय महामारी कायद्याच्या कलम २१७ नुसारही आरोप दाखल करण्यात आलेत.

मार्च महिन्यात तबलीघी जमातच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालय दिल्ली स्थित निझामुद्दीन मरकजमध्ये ६७ देशांतील २०४१ तबलिघी सहभागी झाले होते. यामध्ये ९१६

जणांना दिल्ली पोलिसांनी मरकझमधून काढून क्वारंटाईन सेंटर आणि रुग्णालयात दाखल केले होते.

काही परदेशी तबलिघी त्यापूर्वीच देशातील वेगवेगळ्या भागांत दाखल झाले होते.

तिथे संबंधित राज्य पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली.

उत्तर प्रदेशात यापूर्वीच काही परदेशी तबलिघी जमातीच्या सदस्यांवर चार्जशीट दाखल केली.

दिल्लीत मोठ्या प्रमाणात परदेशी तबलिघी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

उपचारानंतर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले होते.

यातील अधिक जणांची दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून चौकशी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post