देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला मोदीच जबाबदार असतील....


वेब टीम : पुणे
अर्थव्यवस्थेची चाके कार्यान्वित करण्यासाठी प्रत्यक्ष सरकारच्या तिजोरीतून कष्टकरी, कामगार, शेतकरी, बेरोजगार, व्यावसायिकांना मदत झाली पाहिजे.

अर्थव्यवस्थेत सुधारणा न झाल्यास देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.

त्यास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी दिला.

काँग्रेस भवनात चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. रोहित टिळक, अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, इटली, फ्रान्स, जपान, ब्राझील, थायलंड या देशांनी कोरोनाच्या संकटातून नागरिकांना सोडविण्यासाठी थेट तिजोरीतून बेरोजगार, शेतकरी आणि व्यावसायिकांना पैसे दिले आहेत.

भारत सरकारने असा कोणताच निर्णय घेतला नाही. 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे.

त्यातील बहुतांश रक्कम घोषणेआधीच खर्च झाली आहे. थेट खर्चासाठी केवळ 2 लाख कोटी आहेत.

हप्त्यात केवळ सवलत देण्यात आली आहे. ते नंतर भरावेच लागणार आहेत.

व्याज माफ करण्याबाबत अद्याप बँकांना सूचना मिळालेल्या नाहीत. शेतकरी, व्यावसायिकांसाठी कर्जाची तरतूद आहे.

त्यामुळे फसव्या पॅकेजचा निषेेध करीत असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post