अहमदनगर : शहरात 'माकडचाळे'; नागरिकाला घेतला चावा

file photo

वेब टीम : अहमदनगर
शहर परिसरात गेल्या एक दीड महिन्यापासून एक माकड फिरत असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

आज बुधवारी (दि.10) सकाळी या माकडाने दिल्लीगेट जवळ शमी गणपती मंदिरासमोर मटकी विकणार्‍या अशोक मुत्याल यांना चावा घेऊन जखमी केले.

त्यांना खांद्यावर किरकोळ जखम झाली आहे.

हे माकड भाजी तसेच मटकी खाताना त्यांनी मटकीवर झाकण टाकल्याने त्याने त्यांच्यावर हल्ला केला.

गेल्या एक-दीड महिन्यातील त्याचा हा पहिलाच हल्ला आहे.

त्याने हल्ला केल्यावर परिसरातील नागरिकांनी वन्य जीव संरक्षक व निसर्गमित्र मंदार साबळे यांना याबाबत माहिती दिली.

साबळे त्याठिकाणी जावोपर्यंत ते त्या भागातून निघून गेले होते.

त्यांनी मुत्याल यांची भेट घेऊन जखमेची पहाणी केली व याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी एन. बी. पोकळे व वनपाल देविदास पतारे यांना माहिती देऊन त्याला पकडण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post