बिरोबा... यांना सद्बुद्धी देवो... धनंजय मुंडेंचा पडळकरांवर निशाणा


वेब टीम : बीड
‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे’, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, हे पहावे.

बिरोबा यांना सद्बुद्धी देवो’, असे म्हणत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पडळकरांवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले की, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे.

मंडल आयोग,नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून मा.पवार साहेबांनी आम्हा बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं

हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही.

पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी पडळकरांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात हे वाईट वाटतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post