राज्यातील 'या' शेतकऱ्यांनाच मिळणार कर्ज....


वेब टीम : पुणे
राज्यात थकबाकीदार (एनपीए) असलेल्या शेतकर्‍यांना नवे कर्ज देण्यास आमची हरकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा रिझर्व बँकेने दिला आहे.

मात्र, नव्या कर्जाचा वापर आधीचे कर्ज फेडण्यासाठी करता येणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्ज वेळीच न फेडणार्‍या शेतकर्‍यांचे खाते संबंधित बँका थेट ‘एनपीए’ (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) यादीत टाकतात.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 19 लाख शेतकर्‍यांची खाती ‘एनपीए’त टाकली गेली आहेत.

‘एनपीए’ची समस्या शासनाच्या रखडलेल्या कर्जमाफी योजनेतून तयार झाली आहे.

कर्जमाफी जाहीर केल्याने शेतकर्‍यांनी कर्जफेडीच्या रकमा भरल्या नाहीत आणि दुसर्‍या बाजूला शासनाने माफीच्या रकमाही जमा केल्या नाहीत.

या गोंधळामुळे बँका अडचणीत आल्या आहेत.

राज्य शासनाने ‘एनपीए’ग्रस्त शेतकर्‍यांना खरिपासाठी नवे कर्ज देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र, एनपीए खातेदाराला नवे कर्ज देण्यास रिझर्व बँकेची मनाई असल्याची आवई बँकांनी ठोकली होती.

तथापि, अशी मनाई नसल्याचा निर्वाळा आता रिझर्व्ह बँकेनेच दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post