खुशखबर... सकाळपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होणार...


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्रात उद्याच (११ जून) मान्सूनचं आगमन होणार असल्याचं भाकीत पुणे वेधशाळेने वर्तवल आहे.

सर्वप्रथम कोकण किनारपट्टीत मान्सूनचं आगमन होईल.

गेले दोन दिवसांपासून तळकोकणात आणि गोव्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

दक्षिणेच्या किनारपट्टी भागात मान्सून उद्याच दाखल होणार आहे.

असंच वेगवान मार्गक्रमण राहिलं तर शुक्रवारपर्यंत मान्सूनचा पाऊस पुण्यात पोहोचेल आणि आठवड्याच्या शेवटी मुंबईत दाखल होईल.

पुढच्या एक दोन दिवसात पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल.

१५ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला जाईल.

सध्या अरबी समुद्राकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे गोवा, तळकोकणात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी साधारण १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊ शकतो.

येत्या ४८ तासांत नैऋत्य मौसमी मान्सूनचं महाराष्ट्रात दणक्यात आगमन होईल, असा अंदाज पुणे वेशशाळेनं वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पहिल्यात टप्प्यात जोरदार पाऊस पडेल, असंही पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आलं.

कोकणात ११ तारखेला पुण्यात १२ तारखेला तर मुंबईत १३ तारखेला मान्सूनचा जोरदार पाऊस पडेल, असा अंदाजही पुणे वेधशाळेवं वर्तवला आहे.

मान्सूनच्या पहिल्या आठवड्यात प्रामुख्याने बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वाऱ्यांमुळे विदर्भ मराठवाड्यात चांगला पाऊस पडेल अशी माहितीही असंही हवामान खात्याने दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post