मुंबईच्या व्यापाऱ्याचा केला होता गळा दाबून खून; पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या


वेब टीम : अहमदनगर
दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या कलिंगड व्यापाऱ्याच्या खुनातील पारेवाडी (ता. जामखेड) येथील फरार आरोपी नंदू तुकाराम पारे हा कारेगाव ( ता. शिरूर जि. पुणे) येथे टेम्पोने प्रवास करीत होता.

पोलीसांची चाहूल लागताच त्याने टेम्पोतून उडी मारून पळून जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या पथकाने छापा टाकून पकडले.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सन २०१८ मध्ये मुंबई येथील कलिंगड व्यापारी हासन उमर शेख (वय ५०) यांस दोरीने गळा आवळून जीवे ठार मारले.

प्रेताची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह खेड तालुका कर्जत येथील भीमा नदी पात्रात पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने टाकून दिला होता,

व्यापाऱ्यांने विकत घेतलेल्या कलिंगडाची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने मोहन कुंडलीक भोरे( रा. कवडगाव ता. जामखेड) अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, नंदू तुकाराम पारे ( सर्व रा. पारेवाडी तालुका जामखेड) यांनी संगनमत करून हा खून केला होता.

दिनांक २० मे २०१८ रोजी ८ नंतर ते दिनांक २६ मे २०१८ चे दरम्यान रात्री आठ च्या दरम्यान हा खून करण्यात आला.

याबाबत कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्या तील तीन आरोपींना अटक ही करण्यात आली होती

यातील आरोपी नंदू तुकाराम पारे (वय २७ वर्षे रा पारेवाडी तालुका जामखेड) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post