सरकारने अर्थव्यवस्थेचा आलेख खाली आणला : उद्योगपती राजीव बजाज यांचे टीकास्त्र


वेब टीम : दिल्ली
प्रसिद्ध उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सरकारने कोरोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला, अशा शब्दांत बजाज यांनी टीका केली आहे.

लोकांच्या डोक्यातून भीती काढण्याची आधी गरज आहे. यासाठी विचार स्पष्ट असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती आणि उद्योगपतींशी संवाद साधत आहे.

काल त्यांनी राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला.

या चर्चेदरम्यान बजाज यांनी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनवरही टीका केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post