'शरद पवार इन ऍक्शन मोड'; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह, नेत्यांची घेतली बैठक...


वेब टीम : मुंबई
जसेजसे लॉकडाऊन शिथिल होत आहे, तसेतसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ऍक्शन मोडमध्ये येताना दिसत आहेत.

राज्यात येत्या २० जूननंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची घोषणा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली.

मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या या बैठकीत लॉकडाऊन शिथिल करताना कोणकोणत्या व्यवसायांना पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी द्यायची,

तसेच आपापल्या मतदारसंघांमध्ये कोणकोणत्या उपाययोजना सुरू करायला हव्यात, याबाबतही चर्चा झाली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक, दिलीप वळसे-पाटील आदी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हजर होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post