निसर्ग चक्रीवादळ : शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिले आदेश.. म्हणाले...


वेब टीम : मुंबई
‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला आहे.

अशा या कठीण परिस्थितीत प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

कालपासुन संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.

या जिल्ह्यांना तडाखा बसला आहेच शिवाय मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे.

त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि होणार आहे.

अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post