वेब टीम : दिल्ली मराठा आरक्षण प्रकरणी आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्ता...
वेब टीम : दिल्ली
मराठा आरक्षण प्रकरणी आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास कोणताही अंतरिम आदेश अथवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही.
मराठा आरक्षणवर २७ जुलैपासून नियमित सुनावणी केली जाणार आहे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणी सुनावणी झाली.
राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के तर नोकरीमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरूवात केली होती.
त्यानंतर सरकारी पक्षाने आपली बाजू मांडली.
पुढील सुनावणी २७ जुलै रोजी होणार असून तो पर्यंत सरकार आणि अर्ज कर्त्यांनी यावर किती वाद घालायचा हे ठरवले पाहिजे, असे न्यायालायाने दोन्ही पक्षांना बजावले.
दोन्ही पक्षांची बाजू ऐकून पुढील सुनावणी २७ जुलै रोजी घेणार असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.या प्रकरणी २७,२८ आणि २९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी राज्य सरकारची बाजू मांडली.
दरम्यान, वकील श्याम दिवाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगऐवजी प्रत्यक्ष सुनावणी झाली पाहिजे, असे मत न्यायालयासमोर मांडले.
तर मराठा आरक्षणामुळे आरक्षणाची मर्यादा वाढत असल्याचे सांगत त्यांनी मंडल कमिशनचे ही उदाहरण दिले.
तसेच मराठा आरक्षण कायद्यात आहे किंवा नाही ही पडताळणी आवश्यक असल्याचे ही त्यांनी म्हटले.
यापूर्वी ७ जुलै रोजी न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा महत्त्वाच्या प्रकरणांची तातडीने सुनावणी करण्याचा आग्रह योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.
COMMENTS