अजित दादा म्हणाले, पार्थच्या विषयावर बोलून काय फायदा...


वेब टीम : पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार यांनी जाहीर केलेल्या भूमिकेविषयी भाष्य करण्यास नकार दिला. 


पार्थने केलेल्या विधानावर मी बोलणारच नाही, त्या विषयावर बोलून काय फायदा? असा प्रतिप्रश्न विचारत अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाकडे बगल दिली. 

 पुण्यात पहिल्या जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झालं. 


यावेळी पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.


अजित पवार यांनी कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याच्या मुद्द्यावरुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 


“कशाला दाऊद-दाऊद करत बसलाय. कोणीतरी काहीतरी टीव्हीवर दाखवत आहे. काल दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचं सांगितलं. 


आज आमच्याकडे दाऊद नाही दाखवतं आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी हा विषय एका दृष्टीने महत्त्वाचा असून तो पाहण्यासाठी केंद्र सरकार त्यासाठी सक्षम असल्याचंही ते म्हणाले. .


अजित पवार म्हणाले, अरे कशासाठी दाऊद-दाऊद करता. कोणीतरी काहीतरी टीव्हीला दाखवतं. 


काल दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचं दाखवलं. आज पाकिस्तान दाऊद आमच्याकडे नाही म्हणत असल्याचं दाखवतं आहेत. 


तो एका दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. मात्र, त्या टोळीने वातावरण खराब करण्याचं काम केलं आहे. 


केंद्र सरकार आणि संबंधित अधिकारी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. ते सक्षम आहेत. आम्ही त्यात वक्तव्य करणं बरोबर नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post