शिर्डीच्या साई मंदिरासाठी खासदार सुजय विखे आक्रमक... सरकारला दिला इशारा...


वेब टीम : अहमदनगर
कोरोना रोगाच्या थैमानामुळे देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती.

यानंतर जून महिन्यात टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली गेली व त्यानंतर अनुक्रमे जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीला जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी शिथिलता आणली गेली.

महाराष्ट्र राज्यात आता आंतरजिल्हाबंदी उठवण्यात आली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरु करण्यात आली आहे.

मात्र, कोरोना संसर्गाचा अजूनही असलेला धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांवरील बंदी कायम ठेवली आहे.

जैन समाजाने पर्युषण काळात मुंबईतील जैन मंदीरं खुली करण्यासाठी सर्वोच्च कोर्टात धाव घेतली होती.

 यानंतर, काल जैन समाजाला दिलासा देत मुंबईतील दोन जैन मंदिर पर्युषण काळातील अखेरच्या दिवसांसाठी खबरदारीसह खुले करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

यानंतर आता करोडो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिरावरील देखील बंदी उठवत भाविकांसाठी मंदिर खुले करण्याची मागणी अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कारखाना येथे सपत्निक श्री गणेशाची विधीवत स्थापना केली.

यावेळी सुजय विखे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ तसेच‌ सभासद यावेळी उपस्थित होते.

“शिर्डीच‌ं सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील तिरुपती, वैष्णोदेवी मंदिर सुरु झाले.

शिर्डी संस्थान आर्थिकदृष्ट्या‌ सक्षम आहे. ऑनलाईन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरु करणे सोयिस्कर असून, गर्दी न होता ठराविक संख्येने भाविकांना दर्शन देणे शक्य आहे.

सर्व ग्रामस्थांच्यावतीने मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत.

मात्र सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा,” इशाराच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारला दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post