राष्ट्रवादीच्या आमदाराला कोसळले रडू... म्हणाले, भैय्या आम्हाला सोडून का गेलात?


वेब टीम : अहमदनगर
शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांना आदरांजली देण्यासाठी अहमदनगरमध्ये हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी देखील अनिल राठोड यांना आदरांजली वाहिली. 

यावेळी त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले . मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत उभा होतो, तरीही अनिल राठोड यांचे मला आशिर्वाद होते, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं. 

तसेच आपण सर्वजण पोरके झाल्याची भावना व्यक्त केली.

निलेश लंके म्हणाले, “आपल्या सर्वांचे दैवत अनिल भैया राठोड यांचं आज पहाटे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. 

भैया ही आगळीवेगळी शक्ती होती. या शक्तीने अहमदनगर जिल्ह्यातील गोरगरिब जनतेतील बरेच कुटुंब उभे करण्याचं काम केलं, 

त्यांना ताकद देण्याचं काम केलं. आज आपण सर्वजण पोरके झालो आहोत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post