वेब टीम : मनीला काही दिवसांपासून फिलीपीन्सला धमकावणाऱ्या चीनला फिलीपीन्सने इशारा दिला आहे की, आमच्यावर हल्ला केला तर प्रतिकारासाठी अमेरिकेची...
वेब टीम : मनीला
काही दिवसांपासून फिलीपीन्सला धमकावणाऱ्या चीनला फिलीपीन्सने इशारा दिला आहे की, आमच्यावर हल्ला केला तर प्रतिकारासाठी अमेरिकेची मदत घेऊ.
दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये चीनने काही काळापासून घुसखोरी सुरू केली आहे. या क्षेत्रातील सर्व देशांशी कुरापती करतो आहे.
यामुळे त्रस्त झालेल्या फिलीपीन्सचे परराष्ट्र मंत्री टओडोरो लोकसीन यांनी बुधवारी चीनला इशारा दिला की, चीनने आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकेशी केलेल्या सुरक्षा करारानुसार आम्ही अमेरिकेची मदत घेऊ.
यापूर्वी फिलीपीन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो डुटेर्टे यांनी देशातील सरकार या वादामध्ये अमेरिकेची मदत घेणार नाही असे म्हटले होते.
आता फिलीपीन्सने भूमिका बदलली आहे. मनीलामधून बीजिंगला हा इशारा देण्यात आला आहे.
लोकसिन यांनी पत्रपरिषदेत सांगितले की आमच्या वायुसेनेची विमाने या पुढेही दक्षिण चीनच्या समुद्रावर नजर ठेवतील.
या भागावर आमच्या विमानांनी गस्त घालण्याच्या निर्णयावर चीनचा आक्षेप आहे. हे अनधिकृत आहे असा त्यांचा दावा आहे.
पण, पाबाबतच्या खटल्यात ते चीन आंतरराष्ट्रीय न्यायालयात पराभूत झाला आहे, असा टोमणा लोकसिन मारला.
चीनने आमच्या जहाजांवर हल्ला केला तर आम्ही अमेरिकन लष्कराची मदत घेऊ असे लोकसिन म्हणाले आहेत.
नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये अमेरिकेची मदत घेतली जाईल याबद्दल लोकसिन यांनी जास्त खुलासा केला नाही. लोकसिन यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.
अमेरिका आणि चीनमध्ये दक्षिण चीन समुद्रातील हलचालींवरुन संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच आता फिलीपीन्सचे हा इशारा दिला आहे.
बुधावारी रात्री चीनने दक्षिण चीन समुद्रात शक्ती प्रदर्शन करताना चार क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.
ही चारही क्षेपणास्त्र मध्यम अंतरावर मारा करणारी ‘बॅलिस्टीक क्षेपणास्त्र’ असल्याचे सांगितले जात आहे.
या पूर्वीच चीनने हेनान बेटांजवळ क्षेपणातस्त्रांच्या चाचणीसंदर्भात इशारा दिला आहे.
त्यामुळे या भागातील हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
COMMENTS