वेब टीम : पुणे पुण्यात गेल्या सात दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणार्यांची संख्या वाढली आहे. सोमवारी दिवसभरात 1 हजार 499 जण...
वेब टीम : पुणे
पुण्यात गेल्या सात दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणार्यांची संख्या वाढली आहे.
सोमवारी दिवसभरात 1 हजार 499 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 761 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर मागील चोविस तासात 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 12 पुण्याबाहेरील रुग्ण आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून दीड हजाराहून अधिक बाधितांची संख्या आढळून येत आहे.
कोरोनामुक्त होण्याची संख्या वाढ झाली असून आजपर्यंत 50 हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
शहरात जुलै महिन्यातील कोरोनाचा कहर मागील आठवड्यापासून काही कमी झाला आहे.
लॉकडाऊन शिथिलतेनंतर दररोज काही दिवस कोरोनाबाधितांची संख्या दीड हजाराहून अधिक होती.
ऑगस्ट महिन्यापासून बाधितांची संख्या कमी होत असून कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत वाढत होत आहे.
त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र एकीकडे मृत्यूचे सत्र कायम असल्याने चिंता कायम आहे.
शहरात रविवारी स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 5 हजार 133 संशयितांचे नुमने घेण्यात आले.
तर आतापर्यंत 3 लाख 24 हजार 721 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
यापैकी बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 66 हजार 727 वर पोहोचली आहे.
शहर परिसरातील विविध रुग्णालयात 15 हजार 43 रुग्ण उपचार घेत आहेत.
यापैकी 738 रुग्ण अत्यवस्थ असून, मागील चोवीस तासांत एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर यातील 12 जण शहराबाहेरील आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 444 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 294 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 571 वर पोहोचली आहे.
आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 50 हजार 133 झाली आहे.
COMMENTS