राज - उद्धव यांचं ठरलं... मुख्यमंत्र्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद...वेब टीम : मुंबई
शासन जिम सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. 

जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनाकडे पाठवावेत. 

त्या सूचनांच्या आधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

मुंबईतील जिम चालकांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जिम सुरु करतांना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. 

यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. 

ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईतील जिम चालकांचे प्रतिनिधी महेश गायकवाड, निखिल राजपुरिया, करन तलरेजा, हेमंत दुधवडकर, गुरुजितसिंग गांधी, योगिनी पाटील, साईनाथ दुर्गे, रमेश गजरीया, मनोज पाटील उपस्थित होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिम चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्याकडं मांडली होती. 

त्यावेळी राज यांनी जीम चालकांचा प्रश्न समजून घेतला. जीम सुरू केल्यानंतर कशी काळजी घेणार अशी विचारणाही त्यांनी केली. 

जीम चालकांनी सर्व प्रकारची काळजी घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज यांनी त्यांना बेधडक जीम उघडा,’ बघू काय होतं ते! म्हटले होते.

राज ठाकरे यांच्या जीम सुरू करायच्या मागणीला सकारात्मक प्रतीसाद दिला आहे.

आता राज्यातील जिम सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post