पवार काका -पुतन्यामध्ये वाद असल्याने पक्षात अंतर्गत कलह


वेब टीम : दिल्ली
खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. 

एवढंच नाही तर सुब्रमण्यम स्वामी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून नेहमी चर्चेत राहणारे सुब्रमण्यम स्वामी यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदावर भाष्य केले आहे. 

‘राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजितदादा यांच्यात चांगलेच मतभेद आहेत. दोघांचेही वेगवेगळे विचार आहेत. त्यामुळे या पक्षात अंतर्गत कलह आहे’ असा दावाच स्वामींनी केला आहे. 

सुब्रमण्यम स्वामी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे.

निरज गुंडे यांनी सुप्रिया सुळे यांचा सिंगापूर सिटीझनशिप आणि इतर कंपनी व्यवहार याची सीबीआय चौकशीची मागणी केली होती, असा मुद्दा सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थितीत केला आहे. 

आता स्वामी यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post