वेब टीम : मॉस्को रशियातील विरोधी पक्षातील नेते अॅलेक्सी नेव्हल्नी यांच्यावर विमानप्रवासादरम्यान चहामधून विषप्रयोग करण्यात आल्याची धक्कादायक...
वेब टीम : मॉस्को
रशियातील विरोधी पक्षातील नेते अॅलेक्सी नेव्हल्नी यांच्यावर विमानप्रवासादरम्यान चहामधून विषप्रयोग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नेव्हलनी कोमात गेले असून प्रकृती चिंताजनक आहे.
विमान प्रवासादरम्यान नेव्हलनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे.
ते सायबेरीयावरून मॉस्कोला परतत असताना विमानातच त्यांना उलट्या, मळमळ असा त्रास होऊ लागला.
नेव्हलनी यांची प्रकृती बिघडल्याने विमान तातडीने ओमस्कला उतरवण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
नेव्हलनी यांच्या प्रवक्त्या कायरा यारम्यश यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
गरम चहामधून विष देण्यात आल्याने ते वेगाने शरीरात पसरल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलिसांची एक तुकडीही रुग्णालयात दाखल झाली आहे.
नेव्हलनी यांना देण्यात आलेले विष अत्यंत घातक असल्याची माहिती कायरा यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी विमानात बसण्यापूर्वी त्यांनी चहा घेतला होता.
याच चहामधून त्यांना विष देण्यात आल्याची शक्यता आहे. त्यानंतर शौचालयात गेल्यावर ते बेशुद्ध होऊन खाली पडले, अशी माहिती कायरा यांनी दिली.
रशियातील वृत्तसंस्थांनी नेव्हलनी यांच्यावर विषप्रयोग झाल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे म्हटले आहे.
रशियातील सरकारला विरोध करणार्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.
त्यांनी रशियातील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी एका संस्थेचीही स्थापना केली आहे.
सरकारला विरोध केल्याने तुरुंगवास, हल्ला अशा घटनांना त्यांना अनेकदा सामोरे जावे लागले आहे.
COMMENTS